Kshan Jivanache
क्षण मोलाचे :-
क्षण म्हटले कि माणसाला काय आठवते . माणसाला आठवतात फक्त गोड आणि निरागस अशा आठवणी आणि का नाही आठवणार हो कारण त्या असतातच तशा भारी नाही का ?आणि हो खरंतर अशा आठवणी सर्वांकडे असायला हव्याच,हव्याच काय मुळात त्या सर्वांकडे असतातच. लोकांकडे खूपसाऱ्या छान आठवणींचा संग्रह असतो,कोणाच्या आठवणी चांगल्या असतील नाहीतर कोणाच्या आठवणी वाईट असतील नाही का ?
तो क्षण हा त्यावेळेपुरता मर्यादित असतो परंतु ती मजा काय वेगळीच आहे ना तो अल्पावधीचा क्षण आपल्या मनावर आयुष्यभरासाठी एक कोर निर्माण करून ठेवतो नाही का ?तो क्षण फक्त त्या क्षणापुरता मर्यादित न राहता आयुष्यभर आपली साथ निभावत असतो. तो एक क्षण कधीही आपल्या मनातून जात नाही. मग तो चांगला असो कि वाईट त्याचा प्रभाव जाणे जरा कठीणच.
माझ्या आयुष्यातहि बरेच असे क्षण आहेत. काही खूपच चांगले आहेत तर काही खूपच वाईट आहेत. वाईट क्षण वाचण्यात तुम्हाला आंनद मिळणार नाही हे मला ठाऊक आहे तरीही मी माझे काही चांगले आणि काही वाईट क्षण सांगू इच्छितो. काही क्षण हे लहानपणीचे आहेत ते काय तेव्हा चांगले वाटले नव्हते परंतु आता जेव्हा मनाच्या कोपऱ्यातून ते हळूच डोके वर काढतात तेव्हा खूप छान वाटते आणि गालातल्या गालात एक हलकास हसूही येत.
लहानपणी जेव्हा मी सातवीत होतो तेव्हा शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी आमचे वर्गशिक्षक आमचा शाळा सुटल्यावर व सुट्टीच्या दिवशी अधिकचा तास घ्यायाचे व त्यामुळे आमचा चांगला सराव व्हायचा . एके दिवशी असेच गुरुजींनी सुट्टीच्या दिवशी अधिकचा तास ठेवला होता रोज आमचे गुरुजी वेळेवर यायचे आणि आम्ही उशिरा रमतगमत यायचो . परंतु त्या दिवशी काही मुले शाळेत लवकर आली होती आणि आम्ही गुरुजी यायच्या आधी आलो होतो .गुरुजी अजूनही आलेले नव्हते. अरे !!एक सांगायचं तर विसरूनच गेलो आमची शाळा रस्त्याच्या कडेला होती (आहे अजूनही 😂) आणि शाळेच्या पाठीमागच्या बाजूस एक पडके घर आणि घराशेजारी एक वडाचे झाड होते . आणि मी वर्गात शिरायच्या आधी वर्गात बहुतेक एक अफवा पसरलेली होती .की त्या पडक्या घरामध्ये भूत आहे आणि आम्ही ते पाहिलेय हे ऐकून जवळजवळ सर्वच जण घाबरलेल्या स्तिथीत होते आणि त्यात आमचे गुरुजीही नव्हते आले . म्हणून सगळेच घाबरलेले होते.परंतु मी आणि माझे अजून दोघे माझे मित्र खूप जास्त घाबरलेलो होतो म्हणून आम्ही गुरुजी येण्याची वाट न पाहता घरी पळायचे ठरवले. एकतर भूताच्या गोष्टीमुळे आम्ही घाबरलो होतो पण अधिकच्या तासाला सुट्टी घेण्याचे मला कारण मिळाले म्हणून मी खुश . आम्ही तिघे निघालो बाकीचे सर्व गुरुजी यायचे वाट पाहू लागले . पण आमचे दुर्दैव का गुरुजींच सुदैव ते आम्हाला अर्धा रस्ता पार केल्यावर भेटले . आणि आमच्या मनसुब्यांवर पाणी पाडले . आम्ही त्यांना तिथेच सर्व हकीकात सांगितली . त्यांनी सर्व ऐकले व आम्हाला शाळेकडे परत वळण्यास सांगितले.शाळेत आल्यावर गुरुजींनी आमची व अफवा करणाऱ्या सर्व मुलांची अशी काही शाळा घेतली कि ती आम्हाला आज पण आठवते (मलातरी,बाकीच्यांचं माहित नाही 😅) . आणि आमच्या मनातला अंधविश्वाचा कीडा बाहेर काढला. परंतु आजही कुठे पडके घर पहिले कि मनात भीती येते (प्रत्येकाच्या मनातले खेळच ते )
असा होता माझ्या आयुष्यातला एक गोड क्षण जो तेव्हा जरीही भीतीदायक वाटत होता तरीही आज मात्र चांगलाच पोटधरून हसवतो .
अजून एक क्षण सांगतो तो कसा(चांगला कि वाईट ) ते तुम्ही ठरवा . मी लहानपानापासूनच अभ्यासात चांगला होतो. बारावीलाही चांगले गुण मिळऊन इंजिनीअरिंगला ऍडमिशन घेतले.सगळे मित्रपरिवार वेगळे झाले. खूप घाण फीलिंग यायची राव त्या पहिल्या सेमिस्टर मध्ये मित्र नाही कोणी नाही आणि तुम्हाला माहितीच असेल कि नवे मित्र बनवण्याला खूप वेळ लागतो. अश्यातच माझे पहिल्या सेम चे पेपर (परीक्षा )आले आणि संपले सुद्धा. पण मला खूप अवघड गेले. पण माझी धारणा होती कि अरे मी तर लहानपानपासूनच हुशार आहे मी तर काहीही झालं तरी पास होईल. परंतु काय माहित कुणास ठाऊक नशिबाने कुठे पाठ फिरवली . निकालाचा दिवस आला आणि मी निकाल पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळ जणू तुटूनच गेले कि काय असे वाटले . मी चक्क दोन विषयात नापास झालो होतो. मला तर विश्वासच बसेना. मी पूर्णपणे खचून गेलेलो होतो कोणालाच ही अपेक्षा नव्हती माझ्याकडून . मी तर ३ ते ४ दिवस घरी भीतीने निकाल सांगितलंच नाही . मला खूप तणाव आला होता. परंतु मला घरच्यांपासून ते लपवायचेही नव्हते.म्हणून मी भीत भीत का होईना पण सांगितले. मला खूप सारे बोलणे ऐकावे लागले खूप सारा शाब्दिक मारा बसला. कि अरे तू तर हुशार मुलगा होतास मग असे कसे झाले. हे सर्व तेवढ्यापुरतेच होते मी सारे ऐकून घेतले. आणि निर्णय घेतला कि आता काहीही झाले तरी सगळ्यांची तोंड बंद करायची.पुढच्या सेम मध्ये दोन्ही सेमचे विषय एकत्र काढायचे.आणि मग मी अभ्यास केला . व सर्व विषयात पास झालो .
यातून मला एवढे नक्की कळले कि आपण जर ठरवले ना तर आपण काहीही करू शकतो पण आधी आपण आपल्या मनाशी एक दृढनिश्चय केला पाहिजे .
हे होते माझ्या आयुष्यातील आजपर्यंतचे महत्वाचे क्षण !!!!!
शेवटी एकच सांगतो गेलेले ते क्षण आठवणीत ठेवा परंतु त्याची कधीही कोणती चिंता मात्र करू नका . कारण जर तुम्ही गेलेल्या क्षणांची चिंता करत बसले तर तुमच्या आयुष्यात पुढे जे बहुमूल्य असे क्षण येणार आहेत ते वाया जातील किंवा निसटतील . आणि तुम्ही जर पुढच्या येणाऱ्या क्षणांचा आंनद घेतला आणि त्यातून काहीतरी नवीन शिकलात तरच तुमचे जीवन सुखकर आणि समाधानकारक होईल.
( जर तुमचेही काही असेच क्षण असतील तर कंमेंट सेक्शन तुमचेच आहे .लिहा तुमचे क्षण आणि करा मोकळे तुमचे मन ..!!!!)
धन्यवाद !!!
-अक्षय
Comments
Post a Comment